शनिवार, २० जुलै, २०१३

गुरु पौर्णिमा ….

गुरु पौर्णिमा …. साक्षात शिष्यांनी गुरुप्रती भक्तिभावाने साजरा केलेला आनंद सोहळाच. का करतो आपण गुरु पौर्णिमा …


आता तर इंटरनेट वर विकिपीडिया, यु ट्यूब, स्लाईड शेअर , तसेच शेकडो लाखो संकेत स्थळे आहेत जी आपणास घरबसल्या आपल्या संगणकावर व मोबाईल वर क्षणार्धात माहितीचा खजिनाच सादर करतात, अतिशय अवघड गोष्ट हि अत्यंत सुकर करून दाखविली जाते वरील संकेत स्थळांवर, तरी देखील आपण आताही गुरूला तितकच महत्व द्यायचं का अजूनही ?

हो…. आपणास गुरूची गरज जीवनातील प्रत्येक वळणावर हवीच असणार आहे.

कोणतही क्लिष ज्ञान ,एखादी अवघड कल्पना सुगमतेने गुरूच आपणास उलगडून दाखवू शकतो , सांगू शकतो , व आपल्या मनावर बिंबवू हि शकतो.

खरा गुरूच आपल्या शिष्याची खरी क्षमता ओळखू शकतो व त्यास त्याच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करू शकतो व हीच गोष्ट इंटरनेट वरील माहितीत दिसून येत नाही.

पूर्वीच्या काळी गुरु आश्रमात ज्ञान प्रदान करत असत. त्याच्या शिष्यांना साक्षात गुरूच्या सानिध्यातच पूर्ण शिक्षण होई पर्यंत राहावे लागत असे त्यामुळे जो शिष्य श्रद्धापूर्वक व भक्ती भावाने विद्या अर्जन करित असे तो गुरूला प्रिय असे व त्यासच गुरु ज्ञानाची पुढील द्वारे खुली करीत असे. आपला आयुर्वेद , संस्कृत व्याकरण, मंदिरांची मनोहारी रचना, राजवाडे व किल्यांची कल्पक निर्मिती , गणित शास्त्र, हे सर्व शेकडो वर्षापूर्वीही अत्युच्च पातळीवर असण्याच कारण म्हणजे शिष्यांनी गुरुप्रती दाखविलेली श्रद्धा व भक्ती हीच होत .

नालंदा व तक्षशीला विद्यापीठे हि जागतिक पातळीवर नावाजलेली ज्ञान ग्रहणाची केंद्रे भारतात असण्याच म्हणूनच आश्चर्य वाटण्याच कारण नाही.

आपण हल्ली बातम्या वाचतो कि भारतातील विद्यापीठांमधून सध्या मिळत असलेल शिक्षण हे व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी नाही ते जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करत नाही फक्त काही मोजक्याच मुलांना त्याचा फायदा होताना दिसून येतो व समाजातील मोठा वर्ग हा शिक्षण घेवूनही या फायद्या पासून वंचित राहिला जातो, तो का बरे ?

आपल्या भारत देशात आताची शिक्षकांची अवस्थाच अशी आहे कि त्यांनाच त्यांचा पगार वेळेत मिळेल याची खात्री नसते. अ शैक्षणिक कामे त्यांचा कधी पिच्छा सोडत नाहीत. परक्या गावात असणारे नोकरीचे ठिकाण. या सर्व गोष्टी ज्ञान प्रदान करण्यास लागणाऱ्या क्षमतेस खूपच हानी पोहोचवतात. मानसिक बैठक पक्की होवू शकत नाही व आलेला दिवस पुढे ढकलणे हेच कार्य बहुतेक शिक्षक करत असतात. या कारणामुळे ते हि त्यांच्या विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाविषयी, ज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्यात रस दाखविताना कमी पडत असलेले दिसून येतात . याचीच प्रतिक्रिया म्हणजे त्यांचे विद्यार्थीही असा समज करून घेतात कि त्यांच्या शिक्षकांना काहीच येत नाही वा ते मनापासून शिकविण्यात समरस होत नाहीत त्यामुळे विद्यार्ध्यांचा असा ग्रह बनतो कि चांगले शिक्षण हे फक्त मोठ्या शहरातच व चांगल्या शिक्षण संस्थेतेच मिळू शकते. हीच कारणे विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी, रस व श्रद्धा सातत्याने कमी करत असतात .

कोणताही शैक्षणिक प्रवास यशस्वी करावयाचा झाल्यास प्रथम गुरूला त्याच्या स्वत: मध्ये उत्साह ,भविष्याची उज्वल आशा व सातत्याने ज्ञानाची आस प्रामाणिक पणे जागवावी लागणार आहे. तरच तो या गोष्टी त्याच्या विद्यार्थ्या मध्ये सुकर पणे रुजवू शकेल.

विद्यार्थ्यांनी हि मनोमन निश्चय करून, विद्यार्थी दशेत आळस झटकून, खूप कष्ट करण्याची, शिकविलेली गोष्ट पुन्हा पुन्हा नव्याने शिकण्याची, तयारी ठेवली पाहिजे त्यांनीही एखादी गोष्ट जिज्ञासा पूर्वक शिकण्यासाठी स्वत: लाच, का, कसे, केव्हा , कुठे , कशी असे प्रश्न विचारून स्वत: प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे व त्या संबधीची पुस्तके, ग्रंथ स्वत: चाळली पाहिजेत. एखाद्या ज्ञान शाखेविषयी गोडी निर्माण होण्यासाठी याच मुलभूत गोष्टी आहेत.

ज्ञान हे अथांग आहे. त्यामुळे आपणास जी ज्ञान शाखा रुचेल, पटेल, आवडेल जिथे आयुष्यभर काम करण्याची गोडी वाटेल हे विद्यार्थाने स्वत: शोधले पाहिजे. व एकदा निर्णय घेतल्यावर मनापासून श्रद्धा ठेवून अभ्यास व कष्ट केले पाहिजेत मग यश हे दूर नसून सहज साध्य असा आनंदमयी प्रवास ठरेल

आपल्या जीवनात आपणास चांगले शिकविणारी व मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती हि गुरूच असते. गुरु पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छ्या .

गुरुवार, १६ जून, २०११

हो / नाही

खरच हा महाकाय भ्रष्टाचार आटोक्यात येणार आहे कि नाही .... सोप उत्तर तर नाही म्हणून सहज देऊ शकू आपण ... कोणत्याही व्यक्तीला second income सुखावहच वाटत ...त्यात त्याला थोडी बहादुरी केल्यासारख वाटत व माणसाच्या मुलभूत गुणधर्माप्रमाणे समाधान ही मिळून जात ... फक्त ते तात्पुरत असत ...

सरकारी यंत्रणाच नव्हे तर खाजगी क्षेत्रही भ्रष्टाचार करण्यात मागे नाही .... मोठ मोठी कामे निविदांच्या मार्गाने जरी पूर्ण होत असली तरी उच्च पातळीवर पैशांच्या खूप मोठ्या उलाढाली झाल्यामुळेच .. व्हाईट कॉलर लोकांना त्यांच्या त्यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळत असते ..हे मात्र आपण सहज नजरेआड करत असतो ...

समजा कल्पनेत भ्रष्टाचार मिटला अस समजलं तर ज्या सेवा आपण सरकार कडून सद्या घेत आहोत त्यांचे मूल्य हे आताच्या बाजारभावाप्रमाणे सरकारला देणे लोकांच्या एकतर खूप आवाक्याबाहेर असेल .... आणि कागदपत्रांची पूर्तता करता करता पुरती दमछाक होऊन जाईल ...

म्हणूनच थोड्याशा चीरीमिरीत आपली शुल्लक कामे होत असतील तर सामान्य लोकांचा भ्रष्टाचाराला सहाय्य करण्यास कधीच विरोध नसतो ...

आता प्रसिद्धीसाठी काही चतुर लोक सरकारशी पंगा घेत असतील तर सरकार एवढ पण खूळ नाही कि कोणाच बोलण कितपत मानायचं .. एवढे मोठ मोठे राजकारणी ...उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी आजून सेवेत आहेत म्हणूनच हा १२० कोटी जनतेचा गाडा निर्धोक पणे चालविला जातोय ..

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

नाद ब्रम्ह...

ध्वनी लहरी अर्थात आवाज निर्माण करण्यासाठी कोणत्याही दोन गोष्टींची आवश्यकता आसते... टाळी दोन हाताने वाजवली जाते, कोणतेही वाद्य वाजवले जात असताना त्याच्या तारांचा बोटाने किंवा प्लेक च्या साहयाने झन्कार केला जातो.... ही झाली काही मूलभूत उदाहरणे....

या सृष्टीत नेहमीच काही आनोख्या घटना घडत असतात, ज्या थोडे सजग पने लक्ष्य दिले असता दिव्य वाटू लागतात...

आपली सृष्टी ही सतत, दिवस-रात्र, बारा महिने चोवीस काळ एक सारखा नाद करत असते. ज्या साठी कोणत्याही नैसर्गिक वा कृत्रिम गोष्टीची गरज नसते..

आताच्या धावपळीच्या युगात तस तर या गोष्टीला काहीच महत्व नाही... इथे स्वत: च्या मनातल एइकायला कोणाला वेळ नाही, मग या नस्त्या उचपती कोण करणार.... असो.

महत्वाचा उद्देश हाच आहे की, आपणास ही, हा आवाज ऐकू येऊ सकतो, थोड्याशा प्रयत्नाने, रात्री झोप लागण्या पुर्वी या आवाजावर लक्ष केंद्रित केले असता तत्काळ झोप लागते ही झाली फायद्याची गोष्ट....
पण आपले मन जेव्हा जेव्हा सैरभैर होत असते... बैचेन होत असते तेव्हा तेव्हा हा आवाज आपलाच वाटू शकतो... या आवाजाचा अदृश्य धागा मनाला शांति प्रदान करून जात असतो....

प्राचीन ऋषि मूनिना हा अनाहत नाद माहीत झालाच होता... आणि म्हणूनच त्याचे दृष्य स्वरुप म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा पुज्य व पवित्र असा ''ओंकार'' होय..

हा 'अनाहत नाद' आताचे सो कॉल्ड योगगुरू आपणास फक्त गळ्यातुन काढायला शिकवतात.... आणि आपण फक्त आन्धळे पनाने त्याचे अनुकरण करत आलो आहे...

मला इथे एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, आपल्याला देवाने जी द्यानेंद्रिये दिली आहेत ती सर्व आपण कंट्रोल करू शकतो फक्त अपवाद एक, तो म्हणजे आपला 'कान' होय....

पाहायचे की नाही, स्पर्श करायचा की नाही, चव घ्यायची की नाही, वास घ्यायचा की नाही हे आपण सहज वा थोड्या प्रयत्नाने कंट्रोल करू शकतो...... परंतु आवाज स्वीकारायचा की नाही हे नैसर्गिक पने कंट्रोल करू शकत नाही.... कोणताही आवाज येऊ दे, तो तर आपणास स्वीकारावाच लागतो....

हा वरील रेफरेन्स इतक्याच साठी की, सृष्टीचीच ही नैसर्गिक रचना अशी आहे की, आपण तिला कोणत्याही अडथळ्या शिवाय ऐकावे....

हा नाद थोडे प्रयत्न केले असता ऐकू येऊ शकतो हे तर वर सांगितले आहेच... काही ओळखीच्या खुणा म्हणजे 'ओम' हा ध्वनी त्या आवाजाचे दृष्य रूप सर्वाना परिचित आहे, अजुन जवळची खूण म्हणजे 'सू' असा आवाज येऊ लागणे हा होय.... लाइट गेल्यावर सगळीकडे एकदम शांतता होऊन जाते त्या क्षणाला त्याची झलक मिळायची शक्यता थोडी जास्त...

'ओम' या पवित्रा ध्वनीस भारतीय संस्कृती 'अक्षर ब्रम्ह' असे मानते... ज्याचा कधीही क्षर होऊ शकत नाही असे तत्व... म्हणजे साक्षात ईश्वर होय... याचाच नाद रूपात आपण अनुभव घेऊ शकतो... व यालाच नाद ब्रम्ह असे म्हणतात....

गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

अंधार व अवकाश...........!

अंधार, प्रकाशाचा एक विरुद्ध अर्थी शब्द, जीवनातील सगळ्यात नाकारार्थी वाटणारी गोष्ट. भयावह, न आवडणारी, जिथे प्रगती थांबते, वा सर्वांचा शेवट वाटणारी..... किवा नव्या सुरुवाती पूर्वीची ...

आपण ज्या गोष्टी पाहतो त्या सार्‍या या निसर्ग नियमानुसार आचरण करत असतात. सूर्य दररोज उगवतो व मावळतो, पृथ्वी व सर्व ग्रह, तारे आपला मार्ग आक्रमित असतात... ही कोणती शक्ति आहे याचा अजुन तरी कोणीही शोध लावला नाही. विच फोर्स ड्राइव ऑल ऑफ देम अँड फ्रॉम व्हेर इट प्रोड्यूस्ड इटसेल्फ....

माझी छोटीसी तर्क बुद्धी मला अस सांगतेय की विश्वाचा जन्म होण्या अगोदर सगळीकडे फक्त अंधार व मुक्त मोकळे अवकाश यांचेच अस्तित्व असेल. आणि मला वाटत की खरी ईश्वरी शक्ति या अंधारातच समावलेली असेल व ती सर्व अवकाशातही व्याप्त असु शकेल....

आता हेच बघा जेव्हा आपण दिवसभर खूप कष्ट करून जेव्हा रात्री गाढ झोपी जातो तेव्हा पुढच्या दिवशी लागणारी उर्जा वा शक्ति ही कालच्या अंधारातच तयार झालेली असते ना...

आणि मुख्य म्हणजे 'अंधार व अवकाश' तयार करण्यासाठी दुसर्‍या कोणत्याही नैसर्गिग वा कृत्रिम गोष्टीची गरज भासत नाही .......................!

वी आर वेरी डिमांडिंग नाउ अ डेज़..

रंगीबेरंगी - लहान मोठे, निरनिराळ्या आकाराचे फुगे...

एखाद्या चिमुकल्या बाळाने आपल्या इवलाश्या मिठीत ते साठवण्याचा प्रयत्न चालवलाय..
त्याला आजुन निराळ्या रंगाचे फुगे हवे आहेत.. वेगळ्या डिज़ाइन चे, आणखी नव्या मोहक रंगाचे... पण पण त्याच्या त्या छोट्या कवेत आणखी किती फुगे बसणार त्यालाही काही मर्यादा आसणार ना... जरी त्याने आणखी प्रयत्नाने काही फुगे जास्त घेतलेच तर त्याला आधीचे फुगे सांभाळण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागेल ..व त्या प्रयत्नात सध्या हातात असलेल्या फुग्यामधून जो आनंद मिळवायचा आहे त्याकडेही नकळतच दुर्लक्ष होणार ना....

आताही या चिमुकल्या बाळसारखीच आपली अवस्था झाली का हो ..... आपल्या सर्वांची.......
आजुन हव, हे पण पायजे, ते पण पायजे, आसच पायजे, तस नको, मागण्यांची साखळी न संपणारी आहेच..

आसुदे की मग

वी आर वेरी डिमांडिंग नाउ अ डेज़ ...

मग काय करायाच.......................................(फुगेच फोडू या की........ इट्स सो सिंपल )

अनुभव ......

बहुतेक हेच जीवनातील सार ( एक्सट्रॅक्ट ) असावेत.

मानवी जीवनात तृप्ती मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे, निरनिराळ्या उत्कट अनुभवांचा मनसोक्त घेतलेला आस्वाद हाच होय.

तो कोणताही असुदे, सुखद, दुखद, रोमांचक, पलपुटे पनाचा, बे-डर पनाचा , मनाचा दिल्दार पणा दाखविण्याचा, चार चौघात मिरवण्याचा, कोणावर तरी प्रेमाचा वर्षाव करण्याचा अथवा कोणालातरी आश‍चर्याचा सुखद धक्का देण्याचा, किंवा कुणाच्या तरी आठवणीत स्वत: ला विसरून जाण्याचा, वा बेभानपणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा....

अनुभवच मन पटलावर कोरून राहीले जातात ... व आपला खरा गुरू म्हणून मार्गदर्शन ही करत असतात.

निरनिराळ्या अनुभवांची श्रीमंती हे जीवन खूपच समृद्ध करते, धैर्याचे बळ निर्माण करते. आपल खर रूप दुसर्‍याणा दाखविण्याची हिंमत देते. मनातील अनामिक भीती काढून, खरा आत्मविश्वास देऊन जाते.

मग आपल जीवन हे मिटलेली कली न राहता, हसणार पूर्ण उमललेल फुलच बनलेल असेल.

लाइफ ईज़ ग्रेट .......

लाइफ ईज़ ग्रेट .......इथ प्रत्येक जण आपल्या अस्तित्वा साठी प्रयत्नशील असलेला दिसतो..

प्रत्येकाचा स्वार्थच जग सुरळीत चालण्यासाठी उपयोगी पडत असतो... आपण शिरावर घेतलेली आव्हाने, आपला अहंकार , सुप्त लालसा, भौतिक उपभोग घेण्याची मनाची अनिवार इच्छा .....बस एवढ्याच गोष्टी हे महाकाय , भयावह जग सुरळीत पणे चालण्या साठी आवश्यक आहेत....
कुणासाठी कोणतेही उपकार करण्याची गरज नाही वा तसा बढे जाव मारण्याची.

पण येथे एक संधी मात्र आहे ती म्हणजे स्वत: मनात डोका उन पाहण्याची ...तिथेच सर्वात जबरदस्त संधी आहे खरा अनुभव व ज्ञान मिळण्याची... जितके मनास ओळखू तितके आपण सर्व जण अपार आनंदाच्या जवळ जाउ शकतो ..जो कधीही एक क्षण ही कमी असणार नाही .

आपल जड शरीर समजा पृथ्वी तत्व, शरीरातील रस हा जल तत्व, शरीरातील वायू हा वायू तत्व, शरीरातील पोकळी हे आकाश तत्वाचे प्रतीक , व शरीरातील अग्नी हा साक्षात अग्नी तत्वाचे प्रतीक आहे....देवाने दिलेल हे मन अर्थातच सर्वत्र असणार्‍या चैतन्याचे प्रतीक समजले तर अनमोल शरीर हे त्याची सुंदर कलाकारीच ठरली आहे.... म्हणूनच इथे प्रत्येक जनच शक्तिशाली , सुंदर असणार आहे..

म्हणूनच अहंकार सोडून फक्‍त प्रयत्‍न करूयात ही सुन्दरता शोधण्यासाठी...