लाइफ ईज़ ग्रेट .......इथ प्रत्येक जण आपल्या अस्तित्वा साठी प्रयत्नशील असलेला दिसतो..
प्रत्येकाचा स्वार्थच जग सुरळीत चालण्यासाठी उपयोगी पडत असतो... आपण शिरावर घेतलेली आव्हाने, आपला अहंकार , सुप्त लालसा, भौतिक उपभोग घेण्याची मनाची अनिवार इच्छा .....बस एवढ्याच गोष्टी हे महाकाय , भयावह जग सुरळीत पणे चालण्या साठी आवश्यक आहेत....
कुणासाठी कोणतेही उपकार करण्याची गरज नाही वा तसा बढे जाव मारण्याची.
पण येथे एक संधी मात्र आहे ती म्हणजे स्वत: मनात डोका उन पाहण्याची ...तिथेच सर्वात जबरदस्त संधी आहे खरा अनुभव व ज्ञान मिळण्याची... जितके मनास ओळखू तितके आपण सर्व जण अपार आनंदाच्या जवळ जाउ शकतो ..जो कधीही एक क्षण ही कमी असणार नाही .
आपल जड शरीर समजा पृथ्वी तत्व, शरीरातील रस हा जल तत्व, शरीरातील वायू हा वायू तत्व, शरीरातील पोकळी हे आकाश तत्वाचे प्रतीक , व शरीरातील अग्नी हा साक्षात अग्नी तत्वाचे प्रतीक आहे....देवाने दिलेल हे मन अर्थातच सर्वत्र असणार्या चैतन्याचे प्रतीक समजले तर अनमोल शरीर हे त्याची सुंदर कलाकारीच ठरली आहे.... म्हणूनच इथे प्रत्येक जनच शक्तिशाली , सुंदर असणार आहे..
म्हणूनच अहंकार सोडून फक्त प्रयत्न करूयात ही सुन्दरता शोधण्यासाठी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा