जीवन सुंदर असते, जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात , तेव्हा देव ही नेहमीपेक्षा जास्तच आवडू लागतो.मनातील मोर तर सारखा थुई थुई नाचतच असतो.
अस वाटत की सगळीकडे आनंदाचेच पक्षी उडत आहेत. आपल्या अवतीभोवती वाहणारा वाराही जणू आपल्याच आवडीच गाणे खास 'आपल्यासाठीच' गात आहे अस वाटून जात. मनालाही उत्साहाच इतक भरत येत की आपलच आपल्याला आश्चर्य वाटू लागत.
काही जादू झालेली असते का तेव्हा? की आपल्यातच एखादी नवी शक्ति संचारलेली असते? काय गुपित काय असत या मागे, जरा विचार केलाय का कधी,
मित्राणो इथेच तर खरी गंमत आहे बर का.......कारण जेव्हा आनंदाचा झरा वाहू लागतो तेव्हा आधीच्या बर्या-वाईट गोष्टी मन सहजपणे विसरून जाते. व वर उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल आपल्या मनात कोणताही विचार येत नाही कारण मिळणारा आनंद Blindly एन्जॉय करत असतो आपण फक्त......
जेव्हा काही कारणाने आपण थोडे दुखी होतो तेव्हा आपणच या आनंदाच्या झर्यातल पाणी, नसता विचार करत राहून गढूळ करत बसतो नाही का...
मला इथे एवढाच सांगायाच आहे की , आनंद मिळत असताना तो आनंद आपणास का मिळत आहे याचा जसा आपण विचार करत नाही, तसाच दुखी झालो तरी अधिक विचार करन्याने दुखाची तीव्रता आपणच वाढवत बसायच का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा