गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

मुझे मोहोबत सी हो गई है....

मुझे मोहोबत सी हो गई है....

मेरे खायलो मे तेरा ही चेहरा.....


प्रेमाच्या भावनेत कोणी बुडाला नाही अशी व्यक्ती बहुतेक सापडायला कठीणच... आयुष्यातील काही फसव्या वर्षी हे प्रेम नावच फुलपाखरू कधी अलगद येऊन हृदयावर बसत ते आपल आपल्यालाही कलत नाही. आपल पोट न जेवताही भरल्यासारख का वाटू लागत हे पण कलत नाही . नजरेचे बाण झेलायला मनाला घरात बसवत नाही .


तिच्या गल्लीतून हळूच जावस वाटू लागत. तिच्या कॉलेजसामोरचे तर सगळे दुकानदार ओळखीचे झालेले आसतात तिचा गाडीचा नंबर, फोन नंबर, मोबाइल नंबर, क्लास च्या वेळा अचानक लक्षात राहू लागत्. घरात मिस कॉल, ब्लॅंक कॉल चा सिलसिला सुरू झालेला आसतो. आपल्याला वाटत असत की हे सर्व घरातल्य लोकाना समजणारच नाही, पण ते ही आपल्यापेक्षा हुशार निघतात, ते ही कळून न कळल्यासारख करत आसतात .

क्लास जास्त वेळ चालू राहू लागतो, गाडी मधेच बिघडू लागते. ती समोर आली की काय बोलायच, मग ती काय बोलील परत आपण काय बोलायच आशी वेडे पनाच्या संवादाची मालिकाच मनात सुरू होऊ लागते. नुसते बाजून चालत जातानाच छाती जाम धडधडू लागते.


कधी फोन तिने स्वत: उचललाच तर ठरवलेल सगळ विसरून भलताच संवाद होऊन जातो. दिवस दिवस भर नुसता मिस कॉल चा सिलसिला चालू होऊ लागतो, आपला एक तिचा एक, आपले दोन तर परत तिचे आणखी दोन.... टिविवर चांगल गान लागल तरी मिस कॉल द्यायचा... 'शब्देवीन संवादू' या वाक्याचा अर्थ लागलीच कळून जातो व मन तृप्तिच्या झूल्यात झोके घेत आसत.


पहिल्या प्रेमाचा हा सुवास आयुष्यभर दरवळत राहणारच.


मित्राणो वरील सर्व भावना या 7 वर्षापूर्वीच्या आहेत पण मनाला खरी टवटवी आताही देतात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: