गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

माझा पहिला ब्लॉग...

आपण ब्लॉग का बनवतो? मनातल काही सांगण्यासाठीच ना...पण एकदम personal तरी कस सांगायाच तुम्हाला.. काही ओळख ना पालख.

आता डोक उखळात घुसवलयच तर घावासणी का घाबरायाच.....करतो यत्न थोडा थोडा....आधूनमधून भेट देत जावा रसिकानो, तेवडच जिवाला माझ्या बर वाटल. आणि काय बर वाईट सांगायाच आसल तर खुषीने सांगत बी जावा...

या ब्लॉगावर माझ्या मनातल सार सार सुचलेल , इचार, कल्पना ,आनुभव यांची कोल्हापुरी मिसळ बी आसल...आन् बर का पावन मिसळ टेस्ट करताय पर ठसका बी लय जबरी आसतुया ....नाय आदुगारच सांगून ठेवतो.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: