जगात निरनिराळे लोक राहतात, त्यांची जगण्याची व विचार करण्याची पद्धत अलग-अलग आहे. प्रत्येकाची जगण्याची ध्येय व आकर्षने भिन्न आहेत व जीवनविषयक उद्दिष्त्येही वेगवेगळी असणार हे कळले तरी खूपच झाल. कारण त्यामुळे आपण आतापर्यंत ज्या एकसुरी मार्गाने जगत् आलोय त्याची तरी जाणीव होते. आतापर्यंतची आपली ध्येय व उद्दिष्त्ये किती छोटी होती व त्यास कोणतीही चंदेरी झालर नव्हती व किती मीलमिळीत होती याची जाणीव होणे, यातच नंतरच्या संक्रमनाचे बीज होय.
पण मला एक कलत नाही, आपली सर्व ध्येय का विशाल असावित किंवा आगदीच अल्पसंतुष्ट का नसावित? तसेच मानवी जीवनात प्रेम, मैत्री याना तरी आपण का इतक अवास्तव महत्व देतो आलोय? किंवा प्रत्येक गोष्ट निरनिराळे लोक का इतक्या तन्मय्तेन व मन लावून करतात व काही लोक का इतक जिवावर आल्यासारख्या सोप्या गोष्टीही उर्कत असतात? काही व्यक्ती या असीम उर्जेच्या व उत्साहाच्या अखंड उडनार्या करंज्यासारख्या का असतात? तर काही चिखलतल्या डुकरसारख्या का जगात असतात?
खरच का मनुष्य जीवनात येऊन मनासारख जीवन जगायला मिळणे हे एक भाग्य आहे वा मानवी प्रयत्नाचि पराकाष्ठा आहे. नशीब व प्रयत्न यात खरच फरक आहे का व असला तर तो किती? प्रत्येकाच जगण्याच तत्व कस घडत जात, त्याच्या माग कोणत्या गोष्टी तो अनुभवत असतो, अपार दुख: होण्याच किंवा मन कोमेजून जाण्याच काय कारण असेल, किंवा अत्यानंदात सर्व जगाचा विसर कसा काय पडत असेल? हे सर्व आत्म्याचे खेळ पाहून स्वर्गातील देवांचे खरोखरच रंजन होत असेल का? की जीवन जगण्याची खरी रीत कोणालाच उमजली नाही? का आपल्याला जमेल तस फक्त आनंद घेत व दुख: सोसत जगायाच?
जगण्यासाठी खरच का ध्येयाची मृगजळ वा आशेची फळ आवश्यक असतात?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा