गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

अनुभव ......

बहुतेक हेच जीवनातील सार ( एक्सट्रॅक्ट ) असावेत.

मानवी जीवनात तृप्ती मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे, निरनिराळ्या उत्कट अनुभवांचा मनसोक्त घेतलेला आस्वाद हाच होय.

तो कोणताही असुदे, सुखद, दुखद, रोमांचक, पलपुटे पनाचा, बे-डर पनाचा , मनाचा दिल्दार पणा दाखविण्याचा, चार चौघात मिरवण्याचा, कोणावर तरी प्रेमाचा वर्षाव करण्याचा अथवा कोणालातरी आश‍चर्याचा सुखद धक्का देण्याचा, किंवा कुणाच्या तरी आठवणीत स्वत: ला विसरून जाण्याचा, वा बेभानपणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा....

अनुभवच मन पटलावर कोरून राहीले जातात ... व आपला खरा गुरू म्हणून मार्गदर्शन ही करत असतात.

निरनिराळ्या अनुभवांची श्रीमंती हे जीवन खूपच समृद्ध करते, धैर्याचे बळ निर्माण करते. आपल खर रूप दुसर्‍याणा दाखविण्याची हिंमत देते. मनातील अनामिक भीती काढून, खरा आत्मविश्वास देऊन जाते.

मग आपल जीवन हे मिटलेली कली न राहता, हसणार पूर्ण उमललेल फुलच बनलेल असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: